संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्यावतीने डोंबिवलीतील पालिका रुग्णालयाचा परिसरात स्वच्छता अभियान 

डोंबिवली –  संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्या वतीने स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात आले आहे.सद्गुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त देशभरातील २५० शहरांमधील ५६४ सरकारी रुग्णालयाचा परिसर  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी व कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
     शनिवारी सकाळी संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात प्राथना करून स्वच्छता अभियानास सुरुवात केली. विशेष म्हणजे या अभियानात लहान मुलेही सहभागी झाले होते. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचे पाहून नागरिकांनी कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले देवाच्या सेवेबरोबर मानवाची सेवा महत्वाची हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्याच्या या समाजकार्यात माझे संपूर्ण सहकार्य आहे. त्यांच्या विचाराना आणि प्रयत्नांना मी धन्यवाद करतो. यामुळे देश बदलण्यास वेळ लागणार नाही.या अभियानामुळे रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. यापूर्वी संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्या वतीने  काही शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अश्या प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email