संजय सरफरे यांचे निधन

संजय सरफरे यांचे निधन

डोंबिवली : मुंबई, ठाणे आणि रायगड मधील सर्व वृत्तपत्र व मासिकांसाठी जाहिरात प्रतिनिधी म्हणून सक्रिय असलेले संजय सरफरे यांचे बुधवारी पहाटे हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते 50 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चयात पत्नी सुषमा आणि  मुलगा संदीप असा परिवार आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदाना जवळील श्री तिरुपती बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीत राहात होते.  सरफरे हे  गेल्या २५ वर्षापासून जाहिरात क्षेत्राशी निगडीत होते.  सानिका मीडिया ही जाहिरात कंपनी त्यांनी सुरू केली. सर्वच क्षेत्रात त्याचा दांडगा जनसंपर्क होता. मनमिळावू असा त्यांचा स्वभाव असल्याने त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. त्यांच्या अंत्यपविधीसाठी  वृत्तपत्र  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिवमंदिर येथील मोक्षधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email