संजय घरत यांच्यासह भुषण पाटील आणि ललित आमरे यांना जामीन मंजूर
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह भुषण पाटील आणि ललित आमरे या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.त्यामुळे गेले काही दिवस ठाणे कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या घरत यांच्यासह भुषण पाटील आणि ललित आमरे या दोघांचाही कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.१३ जूनला आठ लाखांची लाच घेताना घरत आणि दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
Please follow and like us: