श्री समर्थ सेवा मंडळ तर्फे दासनवमी उत्सव
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – श्री समर्थ सेवा मंडळ, डोंबिवली तर्फे शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दासनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश मंदिर येथील वक्रतुंड सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मनाचे श्लोक, रामनाम जप, दासबोध वाचन, भजन आणि कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या दासनवमी उत्सवात डोंबिवलीकरांनी प्रवेश पत्रिकासह उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा अलका मुतालिक यांनी केले आहे.
Please follow and like us: