श्रीमलंग रोड ते व्दारली पर्यत सुमारे ८० ते ९० अनधिकृत नळजोडण्या तोडल्या …..

डोंबिवली दि.०१ – कल्याण – डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना डोंबिवली औद्योगिक विकास मंडळ पाणी पुरवठा करत आहे. गेले काही दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यातच दर शुक्रवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात मोठया प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या असल्याने पाणी पुरवठा नीट होत नाही. यामुळे मंडळाने सध्या या विरुध्द मोहिेम हाती घेतली आहे. श्रीमलंग रोड ते व्दारली पर्यतच्या भागात सुमारे ८० ते ९० अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगीतले. ही मोहिम यापुढेही सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगीतले.

डोंबिवली औद्योगिक विभागातील उद्योजकही अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे नाराज आहेत. त्याचप्रमाणे सर्व नगरसेवकही याबद्दल सतत आपला संताप व्यक्त करत असतात. निवासीभागातील नागरिकांनी तर या विरुध्द दंड थोपटले असून सुविधा दिल्या नाही तर निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. अनधिकृत नळजोडणी व बुस्टरने पाणी खेचले जात असल्याने पाणी पुरवठा कमी होत असल्याचे अधिकारी सांगतात. पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी कर्मचारी जातात. तेव्हा स्थानिक नागरिक कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. आम्ही भूमिपुत्र असल्याचे सांगतात.

म्हणून गेल्या पंधरा दिवसात कल्याण- शिळ मार्गावरील हिललाईन व मानपाडा पोलीस ठाणे यांच्याकडे मडळाने पोलीस बळ देण्याची मागणी केली होती. मात्र दोन्ही पोलीस ठाण्यांनी पोलीस बळ दिले नाही. यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली. एका अधिकाऱ्याने सांगीतले की, पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आमची असून आम्ही ठरल्याप्रमाणे पुरवठा करत आहे. मात्र कल्याण- डोंबिवली महापालिकेची वितरण व्यवस्था अयोग्य असल्याने पाणी पुरवठा नीट होत नसल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगीतले.सध्या ग्रमीण भागात तर सुमारे ६० ते ७० मार्फत पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक सांगतात. यावरुन पाण्याची स्थिती लक्षात येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email