श्रीगोंद्यातून भरदिवसा कॉलेजच्या तरुणीचे अपहरण

(म.विजय)

नगर – तीन तरुणांनी श्रीगोंद्यात शिकणाऱ्या एक अठरा वर्षांच्या तरुणीचे भरदिवसा अपहरण  केले. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिली अाहे. बोलेरोतून आपल्या मुलीचे अपहरण करणाऱ्या तिघा तरूणांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या तरूणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्यांना अटक झालेली नाही. 

श्रीगोंद्यातील एक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारी ही युवती १३ ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजता घरातून निघाली. नेहमीप्रमाणे दुपारी १ वाजता ती घरी न आल्याने पालकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. 

आमिष दाखवून तिला पळवून नेले… 

श्रीगोंद्यात कशाचे तरी आमिष दाखवून सागर मखरे याने बोलेरोतून (महा ४२ के ७७०९) तिला पळवून नेले. आबासाहेब गिरमकर (अजनुज) व गणेश गोरे (भानगाव) यांच्याशी संगनमत करून सागरने माझ्या मुलीला पळवून नेल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. 
टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा.

रोडरोमिओ सागर मखरे व अन्य काही तरुण मुलींची छेड काढतात. याच कारणातून अनेकदा मारामाऱ्या झाल्या आहेत. या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याची मागणी पालकांमधून होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी आरोपींना अटक झालेली नाही. युवतीचाही ठावठिकाणाही अजून समजलेला नाही. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email