शोक लागून कामगारच मृत्यू ,सर्विस सेंटर मालकाविरोधात गुन्हा दाखल
(श्रीराम कांदु )
डोंबिवली : खडकपाडा परिसरात असलेल्या एका सर्विस सेंटर वर एका कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी खडकपाडा पोलिसानी तपासा अंती सर्विस सेंटर मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे .पवनकुमार दुबे असे मयत कामगाराचे नाव आहे ,सुभास उपाध्याय असे सर्विस सेंटर मालकाचे नाव आहे .
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात माधव संकल्प च्या पाठीमागच्या बाजूस सुभाष उपाध्याय यांच्या मालकीचे सर्विस सेंटर आहे .काही दिवसांपूरवी पवन कुमार दुबे हा कामगार त्यांच्या सर्विस सेंटर वर काम करत असताना इलक्ट्रिक चा शोक लागून त्यांचा मृत्यू झाला .या प्रकरणी पवन च्या नातेवाइकनी सर्विस सेंटर मालकच्या निष्काळजी पणामुळे पवन ला शॉक लागल्याचा आरोप करत खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी तपास करत इलेक्ट्रिक सुरक्षितेतच्या दृष्टी कोनातून सर्विस सेंटर चे मालक सुभाष उपाध्याय यांनी कोणतीही काळजी न घेता निष्काळजी पणा केल्याचा ठपका ठेवत सुभाष उपाध्याय विरोधात गुन्हा दाखल केला आहे .