शेती व्यवहार्य आणि लाभदायक बनवण्यासाठी बहुआयामी धोरण स्वीकारण्याची गरज-उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि.०४ – शेतीला व्यवहार्य आणि लाभदायक बनवण्यासाठी आपण बहुआयामी धोरण स्वीकारण्याची गरज आहे. तसेच शेतीला पुरक उत्पन्न म्हणून बिगर-कृषी व्यवसाय आणि अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धनाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. ते आज हैदराबाद येथे सीआरआयडीएने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे सांगून ते म्हणाले की, जर कृषी क्षेत्राने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली नाही तर देशाच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो. हवामान, बाजारातील परिस्थिती, खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे कृषी क्षेत्रातही बदल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन, अन्न प्रक्रिया यांसारख्या संलग्न व्यवसायांना प्रोत्साहन द्यायला हवे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.