शेतीचे राष्ट्रीयीकरण झाल्यास त्याचा लाभ सामान्यांना होईल ; रामदास आठवले
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या अर्थ शास्त्रीय सिद्धतावर देशाचा आर्थिक विकास होत असून देशातील सर्व शेतीचे राष्ट्रीयीकरण केले तर त्याचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना होईल असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले
येथील प्रगती महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “संसाधन मर्यादा व त्याचा अर्थ व्यवस्थेवर परिणाम “या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते माजी मंत्री जगन्नाथ पाटील प्राचार्य डॉ अशोक महाजन ,डॉ शेंदरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते .
आज आपल्या देशात जी नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्याचा योग्य उपयोग केल्यास आर्थिक विकास होईल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले देशातील सर्व नद्या एकमेकांना जोडल्यास सर्वाना पाणी मिळेल नदी जोड प्रकल्प झाल्यास देशात सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
Please follow and like us: