शेतकरी कर्जमाफी योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणाने अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून 20 मे 2018 अशी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा निर्णय घेतला. वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

 याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक बैठक केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांच्यासोबत झाली. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती डिजिटली जोडण्यासाठी हाती घेण्यात आलेला महानेट कार्यक्रम गतीने पूर्ण करता यावा, यासाठी दूरसंचार कंपन्यांचे फायबर जाळे वापरता यावे, अशी विनंती फडणवीस यांनी त्यांना केली. जेथे सरकारचे जाळे निर्माण झाले आहे, ते त्यांनी वापरावे आणि जेथे त्यांचे नेटवर्क तयार आहे, ते सरकारला वापरू द्यावे, अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक बोलाविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्यातील भाजीपाला, फळे यांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि शेतकर्‍यांच्या हाती सुद्धा अधिक पैसा येईल

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या एका बैठकीला आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. युएईतील सरकारी कंपनी असलेल्या एमआरने यातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली होती. पंतप्रधान नुकतेच संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर गेले असताना तेथे हा विषय चर्चिला गेला होता. भारताला पेट्रोलियम उत्पादनांची असलेली गरज आणि युएईला अन्नाची गरज यातून हा विषय पुढे आला होता.

युएईतील सरकारी कंपनी असलेल्या एमआरने यातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये अन्नप्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली होती.या कंपनीने उद्या मुंबईला भेट देण्याचे ठरविले असून, त्यानंतर ते आपले गुंतवणुकीचा निर्णय घेणार आहेत आणि येत्या महिनाभरात पुढची दिशा ठरविणार आहेत. यामुळे आपल्या राज्यातील भाजीपाला, फळे यांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि शेतकर्‍यांच्या हाती सुद्धा अधिक पैसा येईल. अन्नाची नासाडी सुद्धा यामुळे थांबणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email