शेजार्याच्या भांडणातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१० – मीटर च्या वायर काढण्यावरून शेजार्यांशी झालेल्या वादातून शेजार्यांनी वडील,बहिणीसह तरुणाला बेदम मारहाण केल्याने मानसिक तणावातून या तरुणाने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करत आत्महत्याचा प्रयत्न केला उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. विलास कांबळे असे या मयत तरुणाचे नाव असून या प्रकरणी मयत विलास च्या आईने या भांडणामुळे मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत जबाबदार पाच जणां विरोधात डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी संजय कांबळे ,बाळू घाटोळे ,बारकी घाटोळे ,रवीना उर्फ जीजी घाटोळे ,मीनल वानखेडे या पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करत या मधील संजय कांबळे याला अटक करत उर्वरित फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे .
डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड साईनाथ झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या इंदू कांबळे यांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटर च्या वायरिमुळे आमच्या घरातील भिंतीला शॉक लागत असल्याचे सांगत मीनल वानखडे या महिलेने त्याच्या घरातील मीटर ची वायर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोघा मध्ये वाद झाला. यावेळी संजय कांबळे ,बाळू घाटोळे ,बारकी घाटोळे ,रवीना उर्फ जीजी घाटोळे ,मीनल वानखेडे या पाच जनानी इंदू यांच्यासह त्यांनी मुलगी कोमल ,गौरी मुलगा विलास व इंदू यांच्या पतीला घरात घुसून मारहाण केली. तसेच घरासमोर असलेली मोटर सायकल ची हि तोडफोड केली. यावेळी या पाच जणांनी आपली आई वडिलांना झालेली मारहाण व बहिणीचे ओढणी ओढत ड्रेस फाडल्याचे इंदू याचा मुलगा विलास याला सहन झाले नाही याच मानसिक तणावातून त्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान विलास चा मृत्यू झाला. या प्रकरणी आपल्या मुलांला संजय कांबळे ,बाळू घाटोळे ,बारकी घाटोळे ,रवीना उर्फ जीजी घाटोळे ,मीनल वानखेडे या पाच जनानी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी संजय कांबळे ,बाळू घाटोळे ,बारकी घाटोळे ,रवीना उर्फ जीजी घाटोळे ,मीनल वानखेडे विरोधात गुन्हे दाखल करत संजय कांबळे याला अटक केली उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे.