शुक्रवारी डॉ. मीरा बोरवणकर डोंबिवलीत

(श्रीराम कांदु)
डोंबिवली :
 प्रशासनातील एक संवेदनशील व कार्यतत्पर अधिकारी म्हणुन सर्वपरिचित असलेल्या डॉ. मीरा बोरवणकर या एका कार्यक्रमाचे औचित्य साधून डोंबिवलीत उपस्थित राहणार आहेत. डोंबिवली शहरात गेली 35 वर्षे पै फ्रेन्डस् लायब्ररीच्या माध्यमातून साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविला जात आहे. मुंबईसह पुणे व नाशिक शहरात 30 हजारहुन अधिक वाचकवर्ग सभासद आहेत. या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या सेवाकालात व कारकिर्दीत आलेले बरेवाईट अनुभव व त्यापासून तरुण-तरुणी आणि महिलांनी कोणते कृतिशील धडे घ्यावेत, याबाबत मार्गदर्शन करणारे कृतीशील धडे ‘माझ्या आयुष्याची पानं’ या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने पै फ्रेन्डस् लायब्ररीच्यावतीने शुक्रवारी ताई पिंगळे चौकातील सर्वेश सभागृहात सायंकाळी 6 वाजता डॉ. मीरा बोरवणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. बोरवणकर तरूणांशी व वाचकांशीही मुक्त संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहुन आमच्या साहित्यिक उपक्रमास पाठबळ द्यावे, असे आवाहन लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email