शिवीगाळ करण्यास विरोध केल्याने पितापुत्राला मारहाण
कल्याण दि.११ – कल्याण पश्चिम सह्याद्री नगर येथे संजीवनी सोसायटी मध्ये राहणारे अभिषेक सांगळे हे रात्री १ वाजण्याच्या सुमारास घरी असतांना त्यांना बिल्डींग खाली राकेश कोलगाव हा इसम शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले. अभिषेक व त्याच्या वडिलांनी बिल्डींग खाली जावून राकेशला शिवीगाळ करू नकोस असे सांगत त्याला घरी सोडण्यासाठी त्याच्या घराकडे जाण्यास निघाले. मात्र संतापलेल्या राकेश ने या दोघा पिता पुत्रांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी अभिषेक यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी राकेश कोलगाव विरोधात गुन्हा दाखल केला आहे.