शिवसेनेच्या तीन पालकमंत्र्यांचे खांदेपालट तर अर्जून खोतकरांचं पालकमंत्रीपद काढलं!

(म विजय)

मुंबई – शिवसेनेनं आपल्या खात्यातील पालकमंत्र्यांचे खांदेपालट केलंय. नांदेडचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलंय तर रामदास कदम यांच्याकडून औरंगाबाद जिल्हा काढून घेऊन त्यांच्याकडे आता नांदेडचा पदभार सोपवण्यात आलाय. तर औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंचे विश्वासू डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

परभणीचं पालकमंत्रीपद मात्र, गुलाबराव पाटील यांच्याकडेच कायम ठेवण्यात आलंय. इतर मंत्र्यांची पालकमंत्रीपदं मात्र, आहे तीच ठेवण्यात आली आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांच्याविरोधात पक्ष संघटनेतूनच अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याचीच दखल घेऊन उद्धव ठाकरेंनी हे महत्वाचे फेरबदल केल्याचं बोललं जातंय. राज्य शासनाने आजच या शिवसेनेच्या अखत्यारीतील पालकमंत्रीपद फेरबदलासंबधीचे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. या फेरबदलावरून शिवसेनेनं विदर्भाऐवजी मराठवाड्यावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचं स्पष्ट होत आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email