शिवसेनेचाच आवाज! अंबरनाथ-बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष

( तेजस राजे )

अंबरनाथ आणि बदलापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच आवाज घुमला. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी मनीषा वाळेकर यांची तर बदलापूरच्या नगराध्यक्षपदी विजया राऊत यांची आज बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत प्रचंड जल्लोष केला.

अंबरनाथ-बदलापूरची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ १७ नोव्हेंबर रोजी संपला. त्यासाठी नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. परंतु अंबरनाथसाठी मनीषा वाळेकर आणि बदलापूरसाठी विजया राऊत यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. याची औपचारिक घोषणा २१ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

याआधी शिवसेनेच्या प्रज्ञा बनसोडे अंबरनाथच्या तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी बदलापूरचे नगराध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे.

बलाबल – बदलापूर – शिवसेना – २४, भाजप – २०, राष्ट्रवादी – २, अपक्ष – १. अंबरनाथ- शिवसेना – २६, भाजप – १०, राष्ट्रवादी – ५, काँग्रेस – ८, अपक्ष – ६, मनसे – २.

Leave a Reply

Your email address will not be published.