शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

एकनाथ शिंदे यांच्यासह ३० डॉक्टरांचे पथक५० टन मदतसाहित्य केरळला रवाना

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन, वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे ३० डॉक्टर्स सहभागी

औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स यांच्यासह अन्य वैद्यकीय मदत

तांदूळ, डाळ, साखर, ब्लँकेट, कपडे, साबण यांचाही मदत साहित्यात समावेश

 

ठाणे – केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह ३० डॉक्टरांचे पथक शुक्रवारी केरळला रवाना होत असून कपडे, चादरी, साबण, तांदूळ, डाळ, साखर, बिस्कीटाचे पुडे आदी वस्तूंचा समावेश असलेले सुमारे ५० टन सामान केरळच्या दिशेने गुरुवारी रवाना झाले. शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदारांनी यापूर्वीच केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात केरळला निघालेल्या सामानांच्या ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शहरप्रमुख रमेश वैती आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. शिंदे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विविध प्रकारची मदत सामग्री केरळला पाठवण्यात येत आहे. ३० डॉक्टरांचे एक पथकही केरळला जात असून मी स्वतः आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे या पथकासोबत जाणार आहोत. डॉ. दिनकर देसाई, डॉ. जे. बी. भोर यांच्या नेतृत्वात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन यांच्यासह डॉक्टरांच्या विविध संघटनांचे सदस्य या पथकात सहभागी होत आहेत. केरळमध्ये विविध ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पुराचा जोर ओसरल्यानंतर आता साथीचे आजार पसरण्याची भीती असल्यामुळे वैद्यकीय मदतीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. तसेच, तांदूळ, डाळ, साखर, डेटॉल, साबण, कपडे आदींचीही गरज असून ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ५० टन सामग्री पाठवण्यात येत आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email