शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने सत्कार समारंभ
डोंबिवली – जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या डोंबिवली पश्चिमेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजक्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या महिलांचा गुरुवारी सांयकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षणक्षेत्रातील प्रतिभा भोईर, नेत्रचिकित्सक डॉ. अनघा हेरूर, संबळवादक, सुलभा सावंत,डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षा जानव्ही मोर्ये, अॅड. लीना संसारे, नामदेव शिंपी समाजसंस्था अध्यक्षा जयश्री पेठकर , उद्योजिका रेखा चाळके, पोळीभाजी विक्रेत्या कविता खांदेवाले, महिला प्रबोधन कार्यकर्त्या राजश्री प्रभू,, स्वाती डोंगरे, सक्षम नारी युनियन संस्थेच्या अध्यक्षा स्वाती मोहिते, चित्रपट नृत्य क्षेत्रात कार्यरत राणी टेमकर, अंधत्वावर मात करून बँक ऑफ बडोदामध्ये उच्चपदस्थ अधिकारी ज्योती शीरसंघी या महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे कक्षप्रमुख भाई पानवडीकर यांनी सांगितले.