शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्यातर्फे दिवा – आंगणेवाडी बस सेवा
(एम विजय )
दिवा – दक्षिण कोकणची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सवाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल असतं.
या यात्रेसाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक येत असतात. कोकणातील मुंबईत राहणारा चाकरमानी या यात्रेसाठी हमखास जात असतो. या चाकरमान्यांसाठी आमदार सुभाष भोईर यांच्यावतीने कल्याण ग्रामीण मतदार संघातील नागरिकांसाठी दिवा ते आंगणेवाडी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्याच्या शुभारंभ युवा सेनचे कळवा मुंब्रा अधिकारी सुमित भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी युवासेनेचे अभिषेक ठाकूर, आशिष भोईर,आशिष शिंदे, आकाश म्हात्रे, जुगनू म्हात्रे, पुष्पक पाटील,विराज सुर्वे,परेश म्हात्रे, सागर हाटले, उमेश राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.