शिवराज्य कालीन युद्ध कौशल्य (सिलंबम) स्पर्धेत कल्याण तालुक्यातील खेळाडूंची बाजी
डोंबिवली – ठाणे येथील संकल्प विद्यालयात झालेल्या शिवराज्य कालीन युद्ध कौशल्य (सिलंबम) स्पर्धेत मोहने, कल्याण मधिल खेळाडूंनी 8 सुवर्ण व 2 रजत पदक मिळून वाहवा मिळवली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
ठाणे सिलांबम असोशियशनच्या वतीने १ डिस्ट्रिक्ट लेवल सिलांबम चॅम्पियनशिपचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेत शिवराज्य काळातील लाठीकाठी, तलवारबाजी आदी मध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मोहने, कल्याण येथिल मातोश्री स्पोर्ट्स अकॅडमिच्या सिद्धी जाधव, नेत्रा साळुंखे, कीर्ती गुरव, स्वरूपा गुरव, शुभम जाधव, खुशल जाधव, अनिकेत जगताप, कारुण्य कलेनंद आदींनी सुवर्ण तर प्रांजळ जगताप व युवराज संग्रामपूरकर यांनी रजत पदकावर आपले नाव कोरले. यामुळे सर्व विजयंत्याना चेन्नईत होणाऱ्या राष्ट्रीय सिलांबम स्पर्धयेत आता भाग घेता येणार आहे.
यासर्व विजयी खेळाडूंचा महाराष्ट्र सिलांबम असोशियाशांचे जनरल सेक्रेटरी पी.वाय.अत्तार, ठाणे जिल्हा सिलंबम असोशियशन च्या सचिव आरती चौधरी व प्रशिक्षक वृषभ चौधरी,सूरज गायकवाड यांनी अभिनंदन केले.