शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार,तीन वर्षांसाठीचे अर्ज मागविले
( श्रीराम कांदु )
ठाणे दि २०: राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडु, दिव्यांग खेळाडु, क्रीडा संघटक कार्यकर्ता, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व महिला क्रीडा मार्गदर्शक/ संघटक/ कार्यकर्ती यांच्या साठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षी शिवछत्रपती राज्य जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2014-15, 215-16, 2016-17 या वर्षासाठी पत्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारणीच्या ठरावासह 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगीरीचा तपशील देउन विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivisionsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा . तर ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 5 डिसेंबर पुर्वी स्वयंसाक्षांकीत प्रमाणपत्रांसह सादर करावे. याबाबत अधीक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेत स्थळावर शासन निर्णय पहावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधीकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी केले आहे.