शिधावाटप दुकानांतून महानंदाचे दुध  आणि दुग्धजन्य पदार्थ विकण्यास विरोध

(श्रीराम कांदु)
डोंबिवली : राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनाने शिधावाटप धान्याशिवाय इतर वस्तू खुल्या विकण्यास परवानगी दिली असून याच धर्तीवर शिधावाटप दुकानातून महानंदाचे दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ विकण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून याला शिधावाटप दुकानदारांनी ठाम विरोध केला आहे.
    यां संदर्भात महानंदाच्या अधिका-यानी शनिवारी डोंबिवलीतील शिधावाटप दुकानदांराची सभा घेऊन महानंदाचे दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ विकण्यास ज्यांना इच्छा आहे त्याना ते देण्याची तयारी दर्शवली असून राज्य शासनाने तशी परवानगी दिली असल्याचे सांगीतले.मात्र अनेक दुकानदांरानी याला ठाम विरोध केला.काही दुकानदारानी  दिलेल्या माहितीनुसार सध्या शिधावाटप दुकानात धान्य ठेवण्यास जागा नाही,याशिवाय शिधावाटप दुकान सकाळी १० वाजता उघडले जाते दुधाची विक्री  सकाळी लवकर करावी लागणार असून दुध हे नाशवंत असल्याने ते ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होईल,शिवाय दुकानात राॅकेलचा साठा असतो या पदार्थाना जर राॅकेलचा वास आला तर मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत. शिवाय ग्राहकांनी  इतरत्र दूध  घेणे सुरु केले असून आमच्या दुकानातील दुध कोण विकत घेणार असा सवाल केला. या गोष्टीचा शासनाशी परस्पर संबंध नसल्याचे सांगण्यात आले असले तरी शासनाने याला परवानगी दिली असल्याचे दुकानदारांनी लक्ष वेधले. दुध व दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी डिफ्रीझर  लागणार असून मनुष्यबळही लागणार आहे हे सर्व कुठुन आणणार व याचा खर्च कोण देणार असाही सवाल दुकानदार विचारत आहेत. या संदर्भात महानंदा दुध कंपनीचे मॅनेजर उमेश गावडे यांना विचारले असता त्यानी सांगीतले की यासाठी कोणतीही सक्ती करण्यात आली नाही. या विक्रीचा  शिधावाटप कार्यालयाचा संबध नाही.ज्यांना  घेण्याची इच्छा असेल त्यानाच देण्यात येईल.दुध विक्रेत्याचा  ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असा दावा त्यानी केला.व याचा लाभ शेतकरी,डेअरी व दुकानदार याना लाभ होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email