शिक्षण विभागाला लाज कशी वाटत नाही

शिक्षण विभागाला लाज कशी वाटत नाही?

मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर आदित्य ठाकरेंचा संताप….

कल्याण शहरात मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची जागा महापालिकेने परत घ्यावी…..

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत शिक्षण विभाग अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून या भोंगळ कारभाराची शिक्षण विभागाला लाज कशी वाटत नाही? असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला.त्याच प्रमाणे कल्याण शहरात मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची जागा महापालिकेने परत घ्यावी असेही सांगितले.

कल्याणच्या मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये आज शिवसेना टॉप स्कोअरर डॉट कॉम या वेबसाईटचं लॉंचिंगकरण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर बोलताना मुंबई विद्यापीठाच्या कारभारावरून आदित्य ठाकरे शिक्षण विभागावर तुटून पडले. कल्याण शहरात मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी पालिकेने जागा दिली असून तिथे अजूनही उपकेंद्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता ही जागा पालिकेनं परत घेऊन तिथे विद्यार्थ्यांसाठी स्वतः एखादं कॉलेज सुरू करावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच मुंबई विद्यापीठाला अजूनही कुलगुरू नेमलेले नसून प्रो व्हीसी, रजिस्ट्रार ऑफ एक्झाम्स ही पदंही रिकामी आहेत. शिवाय लॉच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून ऑनलाईन असेसमेंट घोटाळ्याची चौकशी न करताच संबंधितांना मुदतवाढ देत दीड कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या सगळ्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत शिक्षणमंत्री कुठल्या तोंडाने कारभार करतात? शिक्षण विभागाला लाज कशी वाटत नाही? असा सवाल आदित्य यांनी नाव न घेता केला.

Leave a Reply

Your email address will not be published.