शिक्षक, शिक्षकेतर, कला, क्रीडा संघटनांचा संजय मोरे यांना पाठिंबा

तरुणांना रोजगार देण्यात केंद्र शासन अपयशी एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका

ठाणे – शिक्षण आणि बेरोजगारीचा प्रश्न दिवसेनदिवस उग्र स्वरूप धारण करत असताना केंद्राला मात्र याचे गांभीर्य नाही. गेल्या चार वर्षांत देशभरात ५० हजार सरकारी शाळा बंद पडल्या. नोटाबंदीमुळे ४० लाख लोक बेरोजगार झाले. दरवर्षी ४५ लाख तरुण रोजगाराच्या शोधात विद्यापीठांमधून बाहेर पडतात. मात्रशासन त्यांना रोजगार देण्यात अपयशी ठरत असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने ठाण्याचे माजी महापौर आणि उत्तर रायगड संपर्क प्रमुख संजय मोरे निवडणूक लढवत असून  शिंदे यांनी संजय मोरे यांच्यासाठी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. रविवारी ठाणेशहापूरपालघर, वसई, मनोर आणि मीरा भाईंदर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या, तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मेळावे घेतले. त्याचप्रमाणे, विविध संघटनांच्याही गाठीभेटी  शिंदे घेत आहेत. मुख्याध्यापक संघटना, कास्ट्राइब संघटना, कला संघटना, क्रीडा संघटना, शिक्षकेतर संघटना आदी विविध संघटनांनी संजय मोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शिक्षण आणि बेरोजगारी हे आजच्या काळाचे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना या आव्हानाचे गांभीर्य नसल्यामुळे युवा पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका करतानाच  शिंदे यांनी व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब्ज आदी आधुनिक माध्यमाच्या साह्याने शिवसेनेने शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिनेटच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातील समस्यांना हात घातला असून पेपरफुटी, निकालांमधील गोंधळ याबाबतीत आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या संघर्षाच्या भूमिकेमुळेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा मा. राज्यपालांना घ्यावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही शिंदे म्हणाले. संजय मोरे यांच्यासारख्या लढाऊ आणि सुशिक्षित उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी संजय मोरेशिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटीलपालघर संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, रुपेश म्हात्रेअमित घोडा, पालघर सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, महिला संपर्कप्रमुख दीपा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, सुरेश म्हात्रेबदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, वसई जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, जनआंदोलन समितीचे मिलिंद खानोलकर, महिला संपर्क संघटक भारती गावकर, तसेच अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांचाही संजय मोरे यांच्यासाठी प्रचार

युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी मनोर, वसई आणि मीरा भाईंदर येथे संजय मोरे यांच्यासाठी प्रचार मेळावे घेतले. विद्यार्थी आणि तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी विशेष लक्ष घातले असून ते ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मार्गदर्शन मेळावे घेत आहेत. रविवारी पालघर जिल्ह्याच्या सहाही विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचे मेळावे घेऊन त्यांनी संजय मोरे यांच्या विजयासाठी जोर लावण्याचे आवाहन केले. तसेच, मीरा भाईंदर येथेही त्यांचा प्रचार मेळावा झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email