शिकलो पण नोकरी नाही आणि सरकार जागे होत नाही कर्णबधीरांना हवाय रोजगार ….

डोंबिवली दि.०१ – समाजात वावरत असताना `सायलेंट` असले तरी हावभावाने एकमेकांशी बोलणारे कर्णबधीर आज सरकार आणि समाजासमोर आपली व्यथा आणि समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्णबधीर मुलांना पाहून काही वेळाने आपल्या नजरेतीलन कुतूहलता पुसली जाते. शिक्षणाचा उंबरठा ओलांडून जीवनाच्या परीक्षेत उतरत असताना या मुलांना मात्र नोकरी आणि रोजगारासाठी दरवाजे बंद असल्याचे दिसते. त्यात सरकारच्या एकूण दिव्यांग अश्या व्याख्येत काही प्रमाणातच कर्णबधीर मुले असल्याचे त्यांना न्याय मिळत नाही. दुसरीकडे खाजगी कंपन्यांमध्ये या मुलांना नोकरी मिळत नाही. यांची हि व्यथा सरकारने तरी ऐकावी अशी मागणी ओमकार कर्णबधीर विकास संस्थेच्या संचालिका आशा कुलकर्णी यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील क्षितीज गतिमंद मुलांच्या शाळेत पत्रकार परिषद पार पडली. या वेळी ओमकार कर्णबधीर विकास संस्थेच्या संचालिका आशा कुलकर्णी, अध्यक्ष राजेश कुलकर्णी, खजिनदार मनिष निगडे, सदस्य विनोद सुतार आणि महिला विभाग प्रमुख प्रिती मिश्रा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आशा कुलकर्णी म्हणाल्या, डोंबिवलीत सुमारे २०० पेक्षा जास्त कर्णबधीरांच्या रोजगाराच्या शोधात आहेत. तर ज्यांना रोजगार मिळाला आहे त्याच्यांवर भेदभाव होत असून त्याच्या बरोबर असलेल्या कामगारांच्या पगारात वाढ होते, मात्र यांचा पगार वाढत नाही.

सरकारच्या योजना भरपूर आहेत. मात्र त्या योजनांचा फायदा जर अश्या मुलांना होत नसेल तर काय फायदा ? खाजगी कंपन्यानी कर्णबधीरांना कामावरून काढून टाकल्याचे उदाहरण आहेत.त्यामुळे कर्णबधिरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. सरकारी दरबारात गेली नसलो तरी या मुलांना रोजगार मिळवून देण्यास सरकारने लक्ष द्यावे ही आमची मागणी आहे. कामगार भरतीत या मुलांना सफाई कामगार म्हणून भरती केले जाते. तेवढ्यापुरती सिमित न राहता या मुलाच्या शैक्षणिक दर्जा पाहून तरी त्यांना तश्या प्रकराची नोकरी दिली पाहिजे. तसेच खाजगी कंपन्यानी या मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरी द्यावी अशीहि आमची मागणी आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email