शास्त्रीनगर रुग्णालयातील शवविच्छेदनाला डॉक्टरांचा विरोध – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०८ – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन शवविच्छेदन करण्यास डोंबिवलीकर शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी ठाम विरोध केला आहे.कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवलीतील डॉक्टरांनीदगावलेल्या रुग्णांची शवचिकित्सा कल्याणमध्ये येऊन करावी अशी मागणी केली असून यामुळे डोंबिवलीतील डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

कल्याण येथील रुग्णालयात २१ डॉक्टर्स आहेत तर डोंबिवलीत अवघे १३ डॉक्टर्स असून १२५ डॉक्टरांच्या जागा असताना ७५ जागा रिकाम्या असल्याचे डोंबिवलीतील डॉक्टरांचे मत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात फक्त रुक्मिणीबाई रुग्णालयात शवचिकित्सेची सोय असून तशी सोय डोंबिवलीतही करण्यात यावी यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सतत प्रयत्न करत आहेत व मध्यंतरी त्यानी आयुक्तांची भेट घेऊन तशी मागणही केली होती.

कल्याण मधील डॉक्टरांवरील कामाचा ताण पडत असून डोंबिवलीत दगावलेल्या रुग्णांची शवचिकित्सा कल्याणमध्ये येऊन करावी अशी मागणी कल्याणच्या डॉक्टंरानी केली आहे.यासाठी वरिष्ठ अधिकार्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे यामुळे डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे.एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये जास्त डॉक्टर असून गेल्या वर्षात म्हणजे २०१७ मध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात १,१५४ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले म्हणजे बारा तासांच्या कामाच्या वेळेत हे प्रमाण एक किंवा दोन होते याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

डोंबिवलीत मुळातच डॉक्टरांची संख्या कमी असताना जर शवविच्छेदनासाठी डॉक्टर कल्याणला गेल्यास येथील डॉक्टरांवर कामाचा ताण आणखीन वाढेल अशी भिती डॉक्टर्स व्यक्त करीत आहेत. जो वैद्यकीय अधिकारी अपघात कक्षात असतो त्यानेच शवचिकित्सा करणे आवश्यक असते एका रुग्णालयातील डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात जाऊन शवचिकित्सा करावी अशी पध्दत कुठेच नाही याकडे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने लक्ष वेधले.डोंबिवलीत शवचिकित्सा केंद्र सुरु करावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले व जागेचाही शोध सुरु असल्याचे मान्य करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email