शाळेसह घरात घरफोडीचा प्रयत्न फसला
कल्याण – कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात घरफोडीचे सत्र सुरु असून वाढत्या घटना मुळे नागरीका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . त्यातच काल कल्याण पश्चिम आधारवाडी परिसरात एका नामांकित शाळेसह जवळच असलेल्या एका इमारती मधील घरात चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तीन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे .कल्याण पश्चिम उंबर्डे येथील मुठा स्कूल मद्ये काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या शाळेच्या इमारतिचे गेटचे कुलूप तोडून शाळेत चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही कालावधीत चोरट्यांनी जवळच असलेल्या आशापुरा सोसायटी मध्ये रहाणारे मंदार साने यांच्या बंद घरचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही .सदर बाब निदर्शनास आल्याने या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .