शाळेसमोरील खड्ड्यानी व अस्वच्छतेने त्रस्त विद्यार्थी पालिकेत विद्यार्थ्यांनी केली पालिकेत

कल्याण दि.२५ – आपल्या शाळेसमोरील खड्डे व अस्वच्छतेचे साम्राज्य हटवण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी पालिका मुख्यालय गाठले. पालिकेच्या कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नागरिक सुविधा केंद्रात आपले गाऱ्हाणे तक्रारीच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे निदान आता तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :- सैनिकांच्या मुलांसाठी वसतिगृह प्रवेशाचे आवाहन

कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मोह्म्मूदिया इंग्लिश स्कूल असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र पालिका प्रशासनाच्या उदासीन कारभारा मुळे या शाळेच्या परिसरात दुर्गंधी व अस्वछतेचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या शाळेच्या परिसरात रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे गटारे तुंबली असून ओसंडून वाहत असल्याने हे घाणेरडे पाणी रस्त्यावर वाहत आहेत. हे पाणी या खड्ड्यात जमा होत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

हेही वाचा :- उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या हात गाड्यावर पोलिसांची धड़क कारवाई

परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने जागो जागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एकूणच शाळेच्या आसपासच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून याबाबत शाळा प्रशासनाने अनेकदा तक्रारी करत कारवाई ची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप जागरूक नागरिक गफ्फार शेख यांनी केला आहे. शाळा प्रशासनाने पालिकेमधील नागरी सुविधा केंद्राचे कामकाज कसे चालते हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना पालिका मुख्यालयात आणले. यावेळी सुमारे ७० विद्यार्थ्यांनी खड्डे ,कचरा ,तुंबलेल्या गटारा बाबत पालिका प्रशासनाला तक्रारी करत या समस्या निकाली काढण्याची मागणी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email