शाळेतील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची नातेवाईकांची पोलिसांकडे मागणी
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : गुरुवार २ तारखेला डोंबिवलीतील मुस्कान विजय सिंह ( १२ ) वर्षीय या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील गोपालनगर येथे घडली होती . या घटनेला चार दिवस उलटून गेले असून ती ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेतील सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दाखवा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंग हे सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील गोपालनगर येथील ओम दत्ता अपार्टमेंट येथे मुस्कानचे वडील विजय सिंह ( १२ ) हिच्या घरी गेले होते. यावेळी नवीन सिंग यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. तिच्या कुटुंबियांशी बोलताना शिंग यांनी या घटनेबाबत पोलिसांशी बोलणार असल्याचे सांगितले. यावेळी तिचे वडील विजय सिंह म्हणाले , २ तारखेला माझी मुलगी शाळेत गेली होती . संध्याकाळी घरी आल्यावर हा प्रकार घडला. आता आम्हाला त्या दिवसांचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांशी दाखवावे.
Please follow and like us: