शाळेच्या विस्तारासाठी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत शिक्षिकेला ९० हजारांना गंडा
कल्याण – कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटी मध्ये राहणाऱ्या शिक्षिकेची कल्याण पूर्व लोकग्राम येथे गोल्डन स्टार प्ले ग्रुप नर्सरी आहे या शाळेच्या विस्तारासाठी त्यांना कर्जाची गरज होती .त्यासाठी गतवर्षी त्यांनी त्याच्या ओळखीने राज घुगे यांचे राज इंटरप्रायजेस गाठले त्यावेळी घुगे याने त्यांना ठाणे जिल्हा उद्योग केंद्रातून लोन करून देतो असे आमिष दाखवत पेपर बनवण्यासाठी ५० हजार तर व्हेरिफिकेशन साठी ४० हजार असे मिळून ९० हजार रुपये घेतले .मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही कर्ज मंजूर न झाल्याने अखेर या शिक्षिकेने घुगे याच्या कडे पैसे परत मागितले मात्र घुगे याने उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी राज घुगे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: