शांघायमधील सीआयआयई येथे भारताचे दालन देशाचे सामर्थ्य दर्शवितो

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या निमंत्रणावरून, भारताने शांघायमध्ये आयोजित पहिल्या चीन इंटरनॅशनल इंपोर्ट एक्सपो (सीआयआयई) येथे एक कंट्री पॅव्हेलियन (दालन) उभारले, ज्याचे उद्घाटन आज चीनच्या शांघाय येथील राष्ट्रीय प्रदर्शनी व कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले आहे. मार्च 2018 मध्ये दिल्ली येथे झालेल्या संयुक्त आर्थिक समूहाच्या बैठकी दरम्यान चीनच्या वाणिज्य मंत्री झोंग शैन यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते.

वाणिज्य मंत्रालयाने बीजिंगमधील भारताच्या दूतावासाशी चर्चा करून भारताने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवलेल्या व चीनमध्ये बाजारपेठेसाठी चांगल्या असणा-या क्षेत्रांचे या दालनामध्ये प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने, भारत देशाच्या दालनात अन्न आणि कृषी उत्पादने, फार्मास्युटिकल्स, माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारित सेवा, पर्यटन व सेवा क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. भारताचे सामर्थ्य व एकंदरित जागतिक स्थानाच्या तुलनेत चीनमध्ये या चार क्षेत्रांमध्ये भारतीय अस्तित्व शुल्लक आहे. फेडरेशन ऑफ इंडियन कंट्री ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ) ही संस्था सीआयआयई, शांघायमधील इंडिया कंट्री पॅव्हेलियनकरिता भारताची विविध भागात शक्ती दर्शविण्यासाठी साठी एक शीर्ष संस्था असून यामध्ये पर्यटन मंत्रालयासोबतच एपीईडीए, नाफेड, एमपीईडीए, फार्माक्सिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यासह इतर हितधारकांचा सहभाग लाभला आहे. शांघायमधील भारत दूतावासाने स्थानिक स्तरावर सर्व सहकार्य दिले आहे.

चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून भविष्यात संपूर्ण व्यापार जवळजवळ 100 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. चीनबरोबर मोठ्या व्यापार तूटीसंदर्भात दोन्ही देशांनी भारताने व्यक्त केलेल्या चिंतेचे समाधान करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

चीनमध्ये निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करीत आहे. शासकीय स्तरावर विविध द्विपक्षीय बैठकींमधून आणि चीनसह भारतीय व्यावसायिकांच्या सतत गुंतवणूकीतून हे साध्य झाले आहे. अलीकडेच शांघाय आणि ग्वांगझूमधील वाणिज्य दूतावासासोबत बीजिंगमधील भारताच्या दूतावासाने व्यवसाय प्रोत्साहन आणि साखर, चहा, तांदूळ, तेल जेवण आणि फार्मास्युटिकल्ससारख्या उत्पादनांचा समावेश असलेले खरेदी-विक्री मेळावे यांचे आयोजन केले होते ज्यात चीनी आयातदारांनी उत्साहवर्धक सहभाग घेतला होता.

वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांच्या हस्ते आज भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. 6 नोव्हेंबर रोजी चीनच्या वाणिज्य उप- मंत्र्यांसोबत ते द्विपक्षीय बैठक घेतील तसेच प्रमुख साखर आयातदारांसोबतही डॉ. वाधवान बैठक घेतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email