शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदें यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित
(श्रीराम कांदु)
डोंबिवली :ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्यासह अन्य आठ मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी आदी भागातील पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी तो उपक्रम यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सत्कार ठेवण्यात आला असून पालकमंत्री शिंदे यांचा कार्यकर्ता ते पालकमंत्री हा प्रवास, तसेच राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना चांदीची तलवार, मानपत्र यासह विविध सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.