व्यावसायिकाला मारहाण करत पैसे व माल हिसकवून दिली जीवे ठार मारण्याची धमकी
कल्याण – इन्वरटर व बटरी व्यवसायिकाला रस्त्यात गाठून त्यांच्याजवळील इन्वरटर व बटरी हिसकवून चाकुंचा धाक दाखवत त्याच्या जवळील रोकड हि हिसकावल्याची घटना कल्याण पूर्व नांदिवली येथे घडली आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मेहमूद खान याह्च्यासह त्याच्या ८ते ९ साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
उल्हानगर येथे इन्वरटर व बॅटरीचा व्यवसाय करणारे कृष्कुमार यादव काल रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास इन्वरटर व बॅटरी एका रिक्षात टाकून कल्याण पुर्वेकडील नांदिवली येथे एका ग्राहकाकडे फिटिंग साठी येत होते ते नांदिवली येथील हनुमान मंदिर येथे पोहचताच मेहमूद खान सह ८ ते ९ जाणानी त्यांना अडवून त्याच्याजवळील इन्वरटर व बॅटरी हिसकवून घेतले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पाकीटा मधील रोकड हिसकवून घेतली .या प्रकरणी कृष्ण कुमार यांनी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मेहमूद खान याह्च्यासह त्याच्या ८ ते ९ साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .