व्यवसायासाठी दिलेल्या पैशांचा अपहार – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०४ – कल्याण पश्चिम खडकपाडा गांधारी येथील माधव संसार संकुलात राहणाऱ्या मरियम मावची या महिलेने खडकपाडा सर्कल परिसरातील स्पर्श मेडिकल चालवणाऱ्या प्रशांत वाघमारे व दिनेश वाघमारे यांना मेडिकल मधील फर्निचर साठी ,औषढांचा साठा विकत घेण्यासाठी ,सदर मेडिकल च्या गाळ्याचे डीपोझीट असे एकूण १२ लाख रुपये दिले होते. मात्र हे पैसे परत मागितले असतांना प्रशांत वाघमारे व दिनेश वाघमारे या दोघांनी या महिलेला पैसे देण्यास नकार दिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मरियम यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रशांत वाघमारे व दिनेश वाघमारे दोघा विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: