व्यवसायात तरुण वर्ग मोठ्या संख्येने उरतोय ; प्रमोद ( भाई ) जाधव
डोंबिवली – आज तरुणपिढी व्यवसायात करण्यास पुढे येत आहे. भारत देश महासत्ता होणार असून यात तरुणाचा मोठा हातभार लागणार आहे. महाराष्ट्रात विशेषः ठाणे जिल्यात अनेक तरुण व्यवसायाची संधी शोधत आहे. डोंबिवलीत तरुण जर असे पाऊल उचलत असतील तर त्यांचे मी कौतुक करतो, असे भाजप महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे उपाध्यक्ष प्रमोद ( भाई ) जाधव यांनी डोंबिवलीत सांगितले.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील कस्तुरी प्लाझा येथील अश्विनी एंटरप्रायझेस या डोंबिवलीतील नामाकिंत टॅक क्लिनिंग कंपनीच्या उद्घाटन भाजप महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे उपाध्यक्ष प्रमोद ( भाई ) जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी चैतन्य कदम आणि मयुरेश्वर वाडेकर यांनी उपाध्यक्ष जाधव यांचे स्वागत केले. जाधव यांनी कदम आणि मयुरेश्वर यांचे कौतुक करत एका तरुणाने व्यवसायात उडी घेतली असून त्यांच्या अनेक तरुणाने आज व्यवसाय करावे असे सांगितले. आपण आपल्या दैनदिन जीवनात अनेक ठिकाणी वायफळ खर्च करतो. पण आपल्या रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी किती स्वच्छ आहे आपण कधी तपासून बघितले आहे का ? आपल्या शरीरामध्ये ७० टक्के पाणी असते. भारतात ९० टक्के आजार हे पाण्यामुळे होतात.म्हणूनच आपल्या सर्वाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच सर्वाना स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी अश्विनी टॅक क्लिनिंग कंपनी सदैव तत्पर असल्याचे यावेळी कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.