वेस्ट इंडिजचा भारतावर 43 धावांनी विजय
पुणे – वेस्ट इंडिजनं भारताला विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मालिकेतील सलग तिसरं शतक झळकावलं. कोहलीनं एक बाजू लावून धरली असताना दुसऱ्या बाजूनं भारतीय फलंदाज बाद होते. कोहली मैदानात असेपर्यंत भारताच्या आशा जिवंत होत्या. मात्र 42 व्या षटकात कोहली बाद झाला. यानंतर वेस्ट इंडिजनं भारताच्या तळाच्या फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. भारताचा डाव 240 धावांत आटोपला. शाय होप आणि अॅश्ले नर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43 धावांनी पराभव केला. त्यामुळे वेस्ट इंडिजचं मालिकेतील आव्हान कायम आहे. या विजयामुळे वेस्ट इंडिजनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
Please follow and like us: