वेटर ने घातला 35 हजारांना गंडा
कल्याण – हॉटेल मध्ये जेवून झाल्या नंतर बिल भरण्यासाठी ग्राहकाने विश्वासाने दिलेले बँकेचे कार्ड हॉटेलच्या काऊंटर वर न देता बाहेर जावून या कार्ड च्या आधारे एटीएम मधून ग्राहकाच्या बँक खात्यातून वेटर ने तब्बल 35 हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी या वेटर प्रवीण सध्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच शोध सुरू केला आहे .
कल्याण पश्चिम शहाड येथील सपना हॉटेल मध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाने जेवण झाल्यानंतर बिल भरण्यासाठी त्यांनी हॉटेलचा वेटर प्रविण सध्या याच्या हातात देत त्याला पिन नंबर दिला.कार्ड हातात मिळताच प्रवीण ने ते काऊंटर व न देता थेट हॉटेल बाहेर गेला व एक एटीएम मधूम उ कार्डाच्या साहाय्याने तब्बल 35 हजार रुपये काढुन घेतले .सदर बाब निदर्शनास येताच हॉटेल चे मॅनेजर गोपाळ शेट्टी यांनी प्रवीण सध्या विरोधात खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रवीण सध्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. .