वृद्ध नागरिकाला इन्शुरन्सचे आमिष दाखवून घातला हजारोंचा गंडा

 डोंबिवली – एका वृद्ध इसमाला एका लाईफ इंश्युरन्स द्वारे महिन्याला २ हजार पेन्शन देतो सुरुवातील ९९ हजार ९९९ रुपये भरण्यास सांगत सदर रक्कमेचा चेक वटवून या वृद्ध इसामची फसवणूक केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात अमित जैन ,स्मृती जैन व अन्य एका इसमा विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे .
  डोंबिवली पूर्व टिळक नगर राजेन्द्र प्रसाद रोड वर राहणारे संदीप हुन्नरगिरकर ६० यांना गत वर्षी जून महिन्यात अमित जैन व त्याच्या साथीदारांनी एका कंपनीच्या लाईफ इंश्युरन्स द्वारे महिन्याला २ हजार पेन्शन देतो सुरुवातील ९९ हजार ९९९ रुपये भरण्यास सांगीतले .या अमिषाला बळी पडत हुन्नरगिरकर यांनी त्यांना  ९९ हजार ९९९ रुपये चेक सुपूर्द केला .हा चेक वटला मात्र त्याना सांगण्यात आलेली पेन्शन मात्र न मिळाल्यानी त्यांनी या बाबत जैन आणि त्याच्या सहकार्यांना जाब विचारला मात्र त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेत अमित जैन ,स्मृती जैन व अन्य एका इसमा विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दखल करतपुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email