विविध अपघातात दोघे जखमी व अन्य कल्याण डोम्बिवली अपराध वृत्त
(श्रीराम कांदु )
भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून वेगावरील नियंत्रण सुटल्याने अनेकदा निष्पाप नागरिक बळी ठरत आहेत. यातून होणाऱ्या अपघातात अनेक पादचारी जखमी होत आहेत. तर अनेकदा त्यान जीव गमवावा लागत आहेत. अशाच दोन घटना डोंबिवली परिसरात घडल्या आहेत.
भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची धडक लागल्याने एक इसम गंभीर झाल्याची घटना डोंबिवली पुर्वेकडील नांदिवली परिससरात घडली आहे. गंगाराम इंगोले असे या जखमी दुचाकीस्वराचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शिळफाटा रोडला असलेल्या घारीवली गावात राहणार आहे. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास इंगोले आपल्या घरातून दुचाकीवरून नांदिवली रोडने नाना-नानी पार्क येथून जात होते. इतक्यात एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली व या दुचाकीस्वार पसार झाला. या धडकेत इंगोले गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तकार दाखल केली. तर दुसरी घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. खांबाळपडा येथे राहणारे चेतन चतुर्वेदी हे गेल्या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ठाकुर्ली रोडने फडके रोडच्या दिशेने जात होते. अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात चतुर्वेदी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात फरार चालक किशोर बोटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धूम स्टाईलने दागिने लंपास
डोंबिवली पूर्वेकडील कांचन गाव (खंबाळपाडा) येथील ओम रेसिडन्सी येथे राहणारी महिला रविवारी डोंबिवली पूर्व येथून भाजी विकत घेवून सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घराच्या दिशेने परतत होती. 90 फुटी रोड येथे रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीवरून दोन इसम आले. त्यांनी या महिलेला आवाज दिला. वळून पाहताच या चोरट्यांनी क्षणार्धात या महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची माळ खेचून पळ काढला. या प्रकरणी सदर महिलेने डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Click here to Reply, Reply to all, or Forward
|
Please follow and like us: