विवाहितेची आत्महत्या प्रकरण पतीसह नणंदे विरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली – साली प्रिया नायर या महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी प्रियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिचा पती महेश नायर व त्याची बहिण माया सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
डोंबिवली येथे कासाबेला येथे राहणाऱ्या प्रिया नायर या विवाहितेने २०१४ साली राहत्या घरी आत्महत्या केली होती .या प्रकरणी मयत प्रिया यांच्या आईने तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे अखेर तब्बल तीन वर्षांनी पोलीस तपासंती या प्रकरणी तिचा पती महेश नायर व त्याची बहिण माया सिंग यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .याबाबत प्रिया यांच्या आईने महेश याने जिमच्या व्यवसायासाठी वेळोवेळी कर्ज काढले होते .मात्र त्याने हा व्यवसाय न करता या कर्जाचा सर्व बोजा मयत प्रिया यांच्यावर टाकला तसेच महेशची बहिण माया या प्रियाशी सतत भांडण करत होत्या रोजच्या या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार त्यांनी मानपाडा पोलीस स्थानकात केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तपासा अंती गुन्हा दाखल केला आहे .