विधी सेवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

(श्रीराम कांदु )

 ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी कायदेविषयक सेवा दिवस साजरा करण्यात येणार आहे, असे श्री पी एम मोरे,  सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी प्रसिध्दीस कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी 9 नोव्हेंबर  हा दिवस कायदेविषयक सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हा उपक्रम दहा दिवस राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजनासाठी नुकतीच विधी सेवा कार्यालयात बैठक झाली.

 या दहा दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून विधी स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांची देखील मदत घेतली जाणार आहे. शहरातून फेरी काढून विधी साक्षरतेचे महत्व हि समजावून सांगण्यात येणार आहे. कारागृहातील बंदिजनाना विधी विषयक सहायता मिळवून देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना विधी सेवेचे महत्व समजावून सांगण्यात येणारा आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email