विधानपरिषद निकाल: शिवसेना :२,भाजपा : २, तर राष्ट्रवादी : १
मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भाजप २, शिवसेना २, एनसीपी १ असा निकाल लागला असून अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला आहे.
अमरावतीत काँग्रेसकडे तब्बल १२८ मत असताना सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ १७ मत मिळावी असून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना ४५८ मतं मिळाली आहेत.
दुसरीकडे नाशिक मध्ये शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास २०० मतांनी विजय संपादित केला आहे.
तर कोकणातील रायगडमध्ये एनसीपीचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे पराभवाची धूळ चारली.
Please follow and like us: