विद्युत अपीलीय न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष
नवी दिल्ली, दि.१४ – न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी काल विद्युत अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यापूर्वी न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या.
न्यायालयीन सदस्य न्यायमूर्ती के. एन. पाटील, तांत्रिक सदस्य एस.डी.दुबे, आय.जे.कपूर आणि बी. एन. तालुकदार यावेळी उपस्थित होते. ट्रिब्युनल बार असोसिएशनचे अध्यक्ष एम. जी. रामचंद्रन यांनी पीठाला दैनंदिन कामकाजात बार सदस्यांकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
मोठ्या संख्येने वकील आणि अन्य मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
Please follow and like us: