विद्यार्थ्याची फसवणूक करून लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक
विद्यार्थ्याची फसवणूक करून लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक
डोंबिवली :- दि. २६ ( प्रतिनिधी ) खडवली येथील बिस्मिल्लाह एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत बिस्मिल्लह भट्ट कॉलेज ऑफ फाॅमेसी महाविद्यालयात डी फार्मसी कोर्ससाठी ४९ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी टीटवाळा पोलिसांनी महमंद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी (२८ ) महंमद कलीम महमंद याकूब शेख (२८ ) यांना अटक केली आहे. याप्रकरणी संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख (२२ ) यांचा पोलीस शोध घेत आहे. अधिक तपास पो.उप.नि. जे.बी.अहिरराव करत आहेत. आपले वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार आहेत.
Please follow and like us: