विदर्भ बंदला तुरळक प्रतिसाद,खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना केली अटक

(म.विजय)

नागपूर दि.०५ -नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन भरल्याने विदर्भवादी संघटनांनी विदर्भ बंदी हाक दिली खरी, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा बंद पुकारण्यात आला असल्याने चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ नंतर विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले खरे, परंतु त्याला तुरळक प्रतिसाद लाभल्याने हे आंदोलन फसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नागपूर पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी या विदर्भवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘विदर्भविरोधी आमदारांनो परत जा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. परंतु उपस्थित पोलिसांनी आंदोलनाचा या प्रयत्नं हाणून पाडला आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारवर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published.