विदर्भ दौऱ्यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जमिनीवर बसून केले जेवण
अमरावती – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल अमरावती जिल्ह्यातील दुर्गम गावांना भेट दिली. तेथे त्यांनी मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास याबाबत काम करणाऱ्या करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी येथील केंद्रात जाऊन त्यांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी एका ग्रामस्थाच्या घरी जाऊन भोजन केले. राज ठाकरे यांनी जमिनीवर बसून भोजन केले हे विशेष. राज ठाकरे यांनी चिलाटीपासून चार किमी अंतरावरील रुईपठार गावातील नारायण छोटे सेलूकर यांच्या घरी आपल्या सहकाऱ्यांसह दुपारचे भोजन केले. “राज ठाकरे यांनी आमच्या गावाला आणि घराला भेट दिल्यामुळे खूप आनंद झाल्याचे सेलुकर कुटुंबीयांनी सांगितले.
Please follow and like us: