विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर – शेती आणि शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणांसह राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतरही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये घट झालेली नाही. कर्जमाफीच्या अंमलबजावणीनंतरही शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळून घेतले.

२०१८ मध्ये सर्वात जास्त आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या असून, त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि नाशिक विभागातील शेतकर्‍याने आत्महत्या केल्या आहेत.२०१८ मध्ये सप्टेंबर अखेर १ हजार ९६५ शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

हेही वाचा –  बाधितांचे पुनर्वसन करा, नंतरच विस्थापन करा राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुनावले…

सर्वाधिक आत्महत्या अमरावती त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि नाशिक विभागात झाल्या आहेत. सध्या राज्यात विदर्भाचे नेतृत्व असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

फडणवीस सरकारची ४ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने घेतलेला या आढाव्यातून स्पष्ट होत आहे, की राज्य सरकार आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. इच्छा नसतानाही सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली.

पहिल्यांदा सरसकट त्यानंतर निकषांसह दीड लाख रुपयांपर्यंत सरकारने कर्जमाफी जाहीर केली. राज्यात शेतकर्‍यांसाठी खरीप हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वपूर्ण हंगाम आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेतला. परिणामी शेतकर्‍यांना हंगामात पुरेसे भांडवल उपलब्ध झाले नाही. यंदाच्या वर्षात सप्टेंबर २०१८ अखेर राज्यात १ हजार ९६५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email