विकास आराखडे तयार करतांना वाहतूक व्यवस्थेचा प्राधान्याने विचार व्हावा-खासदार कपिल पाटील

(श्रीराम कांदु)

ठाणे दि १८: शहरांचे विकास आराखडे तयार करतांना रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी या बाबींचा प्राधान्याने विचार व्हावा अशी सुचना खासदार कपिल पाटील यांनी मांडली. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नियोजन भवन येथे ते बोलत होते.

या बैठकीत खासदारांनी रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना आखण्याबरोबरच वाहतूक कोंडीमुळे उद्भवणाऱ्या समस्येबाबत चर्चा केली. वाहनांच्या तपासणीसाठी ऑटोमेटेड टेस्ट ट्रेक बरोबरच पार्किंगच्या व्यवस्थेकरिता महानगरपालिकानी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. विकास आराखडे बनविताना वाहतूक यंत्रणांना विश्वासात घेतले जावे असे सांगून कपिल पाटील म्हणाले की, रिक्षा, टैक्सी, ट्रक्स यांचासाठी पे पार्किंग वाहनतळ असावा. केंद्राकडे वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने असलेल्या प्रस्तावांचा मी पाठपुरावा करीन असेही ते म्हणाले.

यावेळी भिवंडी निजामपूरचे महापौर जावेद गुलाम मोहम्मद दळवी, बदलापूरच्या नगराध्यक्ष सावंत, मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, पोलीस उपायुक्त वाहतूक अमित काळे, प्रादेशिक परिवहन अधिकार्ती जितेंद्र पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, श्याम लोही, संजय ससाणे, संजय डोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी देखील आपल्या सुचना केल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email