वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी वाहनधारकांना आवाहन
श्रीराम कांदु
ठाणे :-सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येत की, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन कार्यालय, ठाणे येथे परिवहन संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज दि. 1 फेब्रुवारी पासून बंद करण्यात आले आहे.
वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरीता वाहन तपासणी करावयाची असेल त्यांनी त्या वाहनांबाबत तारीख नक्की करुन ते वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाडेघर कल्याण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे तपासणीकामी सादर करावे,किंवा कोणत्याही लगतच्या इतर ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध असलेल्या इतर कार्यालयात वाहन तपासणीसाठी नेण्याची परवानगी देण्यात येईल. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.
सर्व वाहतुकदार संघटनांनासुध्दा आवाहन करण्यात येते की, उच्च न्यायालयाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत तपासणीबाबत सर्व सभासदांना सुचित करावे. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.