वाहनांची टक्कर आणि वाद दोन जण जखमी..
(श्रीराम कांदु )
कल्याण (प्रतिनिधी) टिटवाळा येथील वरप गावात १५ जानेवारीला रात्री ९.३०च्या सुमारास दोन वाहनांची टक्कर झाली .यात कृषि उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापति आणि पंचायत समितिचे सदस्य व वरप गावचे माजी सरपंच भरत उर्फ़ भाऊ गोंधळे तसेच तुषार उर्फ वामन भाईर हे जखमी झाले. दोघाही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तुषार उर्फ वामन भाईर यांनी भाऊ गोंधळे यांच्या वाहनाला मागुन ठोकर मारली. यानंतर गोंधळे खाली पडले.ही ठोकर मुद्दामुन मारल्याचा समज झाल्याने आसपासच्या लोकांनी तुषार भोईर यांना मारहाण केली. यात भाईर जखमी झाले. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात दोघांवर तक्रार नोंदवण्यात आलीय.दरम्यान याप्रकरणी अद्द्याप कुणाला ही अटक केली नसल्याचे टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.