वाहतूक सप्ताहनिमित्त डोंबिवलीत निघणार भव्य रॅली
(श्रीराम कांदु)
वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेने उद्या (रविवारी) डोंबिवलीत भव्य व्हॅन रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग राहणार आहे.संस्थेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त निवासी विभागातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या महावितरण कार्यालयासमोर सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. आमचे शहर – सायलेंट शहर, हॉर्नवाजविण्याचे दुष्परिणाम, हॉर्न न वाजविण्याचे फायदे, गोंगाट हे प्रदूषण आहे आणि प्रदूषण हा एकविसाव्या शतकातीलअपराध आहे, हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक हे रॅलीचे मुख्य आकर्षण राहणार असल्याचे संस्थेचेअध्यक्ष सुदाम जाधव यांनी सांगितले. संस्थेच्या निवासी विभागातील कार्यालयापासून सकाळी 10.30 वाजता निघणारी रॅली स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडने घरडा सर्कल येथे पोहोचेल. तेथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाला पुष्पहार अर्पण करून ही रॅली शेलार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करेल. त्यानंतर टिळक चौकातील लोकमान्य टिळक पुतळा, ताई पिंगळे चौकातून टिळक रोड-फडके रोड मार्गे इंदिरा चौकातून शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानपाडा रोडने शिवाजी उद्योग नगरातून पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी विसर्जित होणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेश जायस्वाल यांनी सांगितले. या रॅलीत स्कुल व्हॅनचाही मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार असल्याने डोंबिवलीकर जागरूक नागरिकांनी या रॅलीत सहभाग घ्यावा, असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांनी केले आहे.
Please follow and like us: